'कोकण' हे नाव कसे पडले?
संस्कृत भाषेतील 'कोण' (कोपरा) आणि 'कण' (भाग) हे दोन शब्द मिळून कोंकण हा शब्द उदयास आला असा एक समज आहे.
स्कंदपुराणामधल्या सह्याद्रीखंडात सांगितल्याप्रमाणे पूर्वीच्या काळी परशुरामाने एक बाण समुद्रामध्ये मारला आणि जिथपर्यंत तो बाण समुद्रामध्ये पोचला तिथपर्यंत समुद्रदेवतेला मागे सरण्याची आज्ञा केली. ह्याच्यातून जो नवीन भूभाग उत्पन्न झाला त्याला सप्त कोंकण बोलल गेलं. सप्त कोकणचा अर्थ 'पृथ्वीचा / भूमीचा तुकडा' किंवा 'पृथ्वीचा कोपरा' किंवा 'कोपऱ्यातला तुकडा' असा होतो.
१५व्या शतकातल्या काही नोंदीमध्ये कोकणदेशा असा उल्लेख आढळतो.
७व्या शतकामध्ये भारताला एका चिनी प्रवाशाने भेट दिलेली त्याने पण ह्या प्रदेशचा उल्लेख कोकणदेशा असा केला आहे.
इतकं असून पण कोकण ह्या शब्दाचा उगम नक्की कसा झाला ह्या बद्दल निश्चित असा निष्कर्ष काढता येत नाही. सप्तकोकणचा उल्लेख भारतीय इतिहासामध्ये अनेक ठिकाणी झालेला आढळून येतो. काही ठिकाणी तळघाट असा पण कोकणचा उल्लेख केला गेला आहे.
तळटीपा
कोंकण / कोकण हे नाव कसे पडले याविषयी निश्चित उत्तर नाही. सर्वात स्वीकारलेला सिद्धांत आहे की तो "कुक्कण" जमातीमधून आला आहे. दुसरा सिद्धांत असा आहे की तो संस्कृत शब्द कोन आणि कण ह्या शब्दांपासून आला आहे.
कोंकण प्रदेशाचा उगम कसा झाल्याबद्दल कोंकणी लोकांची एक आख्यायिका आहे. किनारी कर्नाटक आणि केरळमधील लोकांमध्येही अशीच आख्यायिका आढळतात. पौराणिक कथानुसार कोंकण प्रदेश भगवान परशुराम यांनी निर्माण केला होता. भगवान परशुराम पश्चिमेच्या घाटांवर उभे राहून आपली कुर्हाड समुद्रात फेकली. जिथे कुर्हाड फेकला गेला तेथे त्याने समुद्राला मागे हटण्याचे आदेश दिले.
हे नवीन क्षेत्र भारताच्या पश्चिमेला भाग होता. पुनर्प्राप्त झालेल्या जमिनींना कोंकण असे म्हणतात.
कोंकण = कोन + कण. म्हणजे कोपरा भाग.
भाषातज्ञ एस शेट्टर यांच्या मते, "कोंकण" द्रविड मूळचा "कोंकनाडु", म्हणजे "खडबडीत असलेली प्रदेश" आहे.
सर्वात स्वीकारलेला सिद्धांत म्हणजे कोंकण "कुक्कण" जमातीचा आहे. कुक्कण लोक हे प्रदेशाचे आदिवासी आहेत. आजचा काळातील कुडुंबि लोक (कुणुबि) कुक्कणांचे वंशज असल्याचे म्हटले जाते. त्यांनी ज्या भूमीत वास्तव्य केले त्यांना कोंकण म्हणतात. कोंकणी भाषा त्या प्रदेशातील महाराष्ट्री प्राकृतपासून विभक्त झाली आणि त्याला कोंकणी म्हटले जात.
उत्तर कोंकण (महाराष्ट्र कोँकण) चे ऐतिहासिक नाव "अपरांत" आहे. गोव्याला गोमंतक म्हणतात.
कोकणची योग्य ऐतिहासिक व्याख्या उत्तरेकडील चिपळूण जवळील वाशिष्ठी नदी आणि दक्षिणेकडील कारवार जवळील काळि नदी आहे. कोंकणची आधुनिक व्याख्या उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळ मधील कासारगोड पर्यंत आहे. महाराष्ट्रात कोंकण प्रदेशाला मराठीत कोकण म्हणतात.
हे मी 'समग्र पनवेलची गाथा' पुस्तकात वाचलेल्या माहिती वरून लिहित आहे.
'कोकण' हे नाव 'कोंगवन' म्हणजे कोंग जमातीच्या वास्तव्य करणाऱ्या लोकांवरून 'कोकण' शब्दांची निर्मिती झाली असावी त्यामुळे आजतागायत आपण कोकण हाच शब्द वापरतोय.
'कुंकण' नावाच्या एका नागकुलाने आपले अधिराज्य प्रस्थापित केले होते त्यामुळेच या प्रदेशाला 'सप्तकुंकण' किंवा आत्ताचे कोकण नाव प्राप्त झाले असे म्हणतात.
श्री.स.आ.जोगळेकर ह्यांनी महाराष्ट्रात सात कोकण होते असा उल्लेख केला आहे आपल्या सह्याद्रीच्या लेखमालेत म्हटले आहे लाट, डांग, शूपारक, अष्टागर, कोकण, गोमंतक व वनवासी अशी त्या सात कोकणांची नावे दिली आहेत.
कोकणचा उल्लेख 'अपरान्ह' असाही केलेला आढळतो प्राचीन काळी कोकणाला अपरान्त असेही संबोधत.
Comments
Post a Comment