महाराष्ट्रातील कोणत्या गावांची नावे विनोदी आहेत?
' इचलकरंजी ' हे नाव मला उचलकरंजी सारखे वाटून हसू यायचे. विनोदाचे लक्षणच असे की,अपेक्षे पेक्षा विपरीत अनुभव आला की आपण तिथे हसतो.
गावाच्या नावातही अशीच गंमत घडते.कधीच अपेक्षा नव्हती अशी गावाची नावे वाचली वा ऐकली की आपण खुदकन हसतो. अशीच काही गमतीशीर गावाची नावे खाली देतो आहे.ती वाचल्यावर नक्कीच तुमच्या गालावर कळी फुलणार आहे.ही विनोदाची मोठी मेजवानी असणार नाही, पण विरंगुळा म्हणून चणे फुटाणे खायलाही काही हरकत नाही ना ?
प्रारंभी जिल्हा देऊन पुढे त्या जिल्ह्यातील गावांची गमतीशीर नवे दिली आहेत.करमणुकी बरोबर माहितीत भर.
१)ठाणे :--अननस.
२) रायगड:--रामराज, सहान.
३)सिंधुदुर्ग :--आई ,भांडकुली, पुरळ, मागवली.
४)जळगाव :--उंदिरखेडा, वेळ, कका, लंगडा आंबा.
५)धुळे :--लकड्या हनुमान, वारूळ, विसरणे, भांडणे, धाडणे, खट्याळ, कुत्तरखांब, हट्टी,
६)नंदुरबार:-- काठी, वैरी, कात्री, शहाणे, लंगडी भवानी, खोल विहीर,खेकडा.
७)नासिक :--भेलपुरी, रगतपुरी, इगतपुरी.
८)अहमदनगर :--दाढ, कृष्णधवल, खर्डा.
९)पुणे :--नवलाख उंबरे, चादर, घोळ, राहू, अंथूरणें, नाव्ही,राख.
१०)सातारा :--शेणवडी, वनवास माची,मढे, आंधळी, अटक,
११)कोल्हापूर :--लोळणे, साजणी, इंगळी,डुक्करवाडी, नागवे,मासा, सोळाफुंख.
१२)सोलापूर :--कुत्रेवाडी, आगलावेवाडी,कुगाव, इंचगाव,
१३)औरंगाबाद :--लिहा, नक्षत्रवाडी.
१४)जालना :--नळ विहिरी,चिकनगाव, माहेर भायगाव,माहेर जवळ.
१५)परभणी :--डाकू पिंपरी.
१६) हिंगोली :--पिंपळाचोऱ्या, इंजनगाव,वरुड वक्रपान.
१७)नांदेड :--हुंडा, सुजलेगाव.
१८)लातूर :--कोपरा, तोंडचिरा, जाऊ,नणंद, काळमाथा.
१९)उस्मानाबाद :-- इडापीडा,ताकविकि, गोंधळवाडी.
२०)बीड :-- सांडस, पुडी, काडी.
२१)अकोला :-- हात, कोळसा, हातरुन, कट्यार, दहातोंडया, जमुना.
२२)वाशीम :--कोतवाल, दिल्ली, जयपूर, हरला.
२३)अमरावती :-- ऐकताई, थुगाव, दाढी, तेलपाणी.
२४)यवतमाळ :-- गाडी.
२५)वर्धा :-- सावली, फुकटा,गारपीट, जुनापाणी.
२६)नागपूर :-- सुंदर, नक्षी, खिडकी, चिंचकाढा, सोनाली ,सातनवरी.
२७)भंडारा :-- लोभी, टांग, पाहुनी, चांदी, सोनी, ताई, पाऊनगाव, सासरा.
२८)गोंदिया :-- पुजारी टोला,उष्ण टोला, धोबी टोला, बाजार टोला, महारी टोला, महाजन टोला, भुसारी टोला, टेकडी टोला, डोंगरी टोला, बोरी टोला, चिंच टोला,
२९)चंद्रपूर :-- धाबा, टिटवी, मंगी.
३०)गडचिरोली :-- पेकिंग कसा, घोट, परकी, लगाम, झेंडा, लंका वेन, रमेश गुडम, बिडी.
असे हे ग्रामनाम पुराण !!
पटले वाचावे, नातरी वळचणीला खोचावे !!
१. अंधेरी - अंधाराचा आणि या ठिकाणचा काही विशेष संबंध असावा असं वाटू शकतं एखाद्याला.
२. सेंट्रल लाईनवर दोन एकापाठोपाठ एक स्टेशन्स आहेत. एकाचं नाव आहे 'दिवा' आणि दुसऱ्याचं नाव 'कोपर' !!
३. पालघर- नक्की कोणाचं घर..
४. टिटवाळा- सगळं काही ठीक आहे पण हिंदीत 'टिटवाला' लिहायला लागतं त्याचं काय...
५. कल्याण- अहो कोणाचं?
६. कांदिवली आणि बोरिवली- हि नावं जराशी वेगात म्हणली कि कांदेवाली आणि बोरंवाली ऐकल्यासारखं वाटतात
७. ठाणे- एक जमाना होता जेव्हा ठाणे म्हणजे फक्त पोलीस स्टेशन असा अर्थ व्हायचा
बाकी महाराष्ट्रातील काही नावं सांगायची झाली तर पनवेलजवळचं पेण, सांगली जिल्ह्यातील विटा, नांदेड जिल्यातील लोहा, अशी काही नावं सांगता येतील. कोकणातही कोण, गाणे, नाचणे, डेट नावाची गावे आहेत.
पण या सगळ्यात एक नाव ऐकलेलं जे कधीच नाही विसरत. सोलापूरकडून उस्मानाबादला जाताना १०-१५ किलोमीटरवर एक गाव आहे. गावाचं नाव काय तर म्हणे ..हगलूर!
अनेकांना परिचित असलेलं भोसरी हे गावाचं नाव विनोदी वाटतं आता ते का वाटत हे इथे सांगायला नको.
सिंगापूर, आता यात हसायचं काय? कारण हे एक गाव आहे महाराष्ट्रात. माझा मित्र जिल्हा मध्यवर्ती बँकेत असताना त्याला बँक ब्रँच ची यादी व ती गवे जाऊन भेटाय लागायची, त्यात हे नाव.
त्याच्या बँकेची मापे काढायला गेलो को तो म्हणतो आमची बँक ब्रँच सिंगापूर ला आहे. :)
तुम्ही विचार करा तुम्ही या गावाला गेला आणि मित्रण विचारला की कुठे आहे?
सिंगापूर :)
∆आमच्या तालुक्याचे नाव 'हातकालन्गडे' असे आहे. यात काहि गमतिशिर नाहि. हे नाव English मध्ये Hatkanangle असे लिहितात् पण हिन्दी मध्ये Railway स्थानकावर 'हातकालन्गडा ' असे लिहिलेले आहे. बरीच नवीन लोक याला Hat-ka-langada (हात का लन्गडा ) असे वाचतात आणी हे कसे शक्य आहे असा विचार करित बसतात.
नंदूरबार जिल्ह्यात मध्य प्रदेश सीमेजवळ 'लंगडी भवानी' हे गाव आहे. जवळच 'लकडा हनुमान' नावाचंही गाव आहे.
जळगाव जिल्ह्यात 'घुसर्डी'(ता.भडगाव) हेही एक मजेशीर नाव.
पारोळा तालुक्यात असलेले 'उंदीरखेड' आणि नाशिक जिल्ह्यात मालेगावजवळ असलेली 'लुल्ले-गरबडे' ही जोडगावेही त्याच पंगतीतली.
बऱ्याच लोकांना आमचं चाळीसगाव हे नाव सुद्धा विनोदी वाटतं. इस गाव तीस गाव, भिकाऱ्याला चाळीसगाव ही म्हण असल्याने बहुतेक! नाहीतर ज्या गावाने डॉ वा ग पूर्णपात्रे (सोनाली सिंव्हीन) माधवराव चितळे (जलतज्ञ) केकी मुस ( जगविख्यात छायाचित्रकार) अशी रत्ने पैदा केली ते फक्त भिकारी लोकांसाठी?
महाराष्ट्रातील नव्हे, पण मध्य प्रदेशातील एका गावाचे नाव इंदूर च्या एस् टी स्टॕन्ड् वर वाचून चाळीस वर्षांपूर्वी माझी वा माझ्या पंजाबी साहेबाची हसून हसून पुरेवाट झाली होती.
गावाचे नाव - 'खुर्दाखुर्दी' !
नाशिक पुणे highway वर संगमनेर च्या पुढे गेल्यास गाभणवाडीनावाचे गाव लागते तसेच पुण्याहून जेजुरीकडे जाताना तक्रारवाडीनावाचे गाव आहे..आमच्या गावाजवळही एक वैतागवाडी नावाचे गाव आहे परंतु 2006 मध्ये राष्ट्रपतींनी गावाला भेट दिल्यावर गावचे नामकरण करून आशाकिरणवाडी नाव ठेवलंय
औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव आहे, कन्नड.
हे नाव विनोदी आहे.
कन्नड म्हणजे एक भाषा आणि इथे एका गावाचे नाव.
कन्नड भाषा आणि ह्या गावाचा काहीही संबंध नाही.
नगर जिल्ह्यात व संगमनेर तालुक्यात धांदरफळ नावाचे गाव आहे.
माझा एक सहकारी प्रत्येक काम करताना धांदरटपणा करायचा तेव्हा मी त्याला धांदरफळ म्हणून चिडवत असे.
मला मजेशीर वाटणारे महाराष्ट्रातील काही गावांची नावे-
१) इचलकरंजी
२) कवठेमहांकाळ
३) चाळीसगाव
४) अक्कलकुवा
५) नातंपुतं (सोलापूर)
६) हातकणंगले
७) मंचर
८) गगनबावडा
अहमदनगर जिल्हा - मुंगी, टिटवी
कोल्हापूर जिल्हा - आंबा
ठाणे जिल्हा - कावळे
धुळे जिल्हा - हाच्ची, सुळे
पालघर जिल्हा - आंबटपाडा, आपटी, केळघर, गांजे, गुंडाळी, दांडा
बुडकी विहीर हे धुळे जिल्ह्य़ातील एक गाव आहे.खिळेगाव , बैलहोंगल ही गावे बेळगावी जिल्ह्य़ातील आहेत. मिश्रीकोटी, नरेंद्र ही गावे धारवाड जिल्ह्य़ातील आहेत.
सगळीच उत्तरं मनोरंजक आहेत. अजून थोडी भर घालतो…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात (देवगड तालुक्यात) एका गावाचं नाव आहे पडेल!
फातर्फेकर नावाचं एक आडनाव ऐकलंय. म्हणजे गावाचं नाव फातर्फे?
ताकीद : केवळ वयस्कांसाठी. अल्पवयीन वाचकांनी दूर राहावे.
स्थळ : महाराष्ट्रातील गोंदिया शहराजवळ
Comments
Post a Comment