Posts

Showing posts from July, 2020

जाधव आडनावाचा इतिहास काय आहे?

महाराष्ट्रात आठव्या शतकापासून यादवांचे राज्य होते. हे यादव श्रीकृष्णाचा भाऊ बलराम यांचे वंशज होते. बलरामाच्या वंशातील दृढप्रहार हा या वंशाचा मूळ पुरुष होता. या वंशातील सेऊणचंद्र यादवाने महाराष्ट्रात साम्राज्य स्थापन केले.त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये बलराम या व्यक्तिमत्त्वाला खूप मोठे आदरस्थान होते. बलरामाची प्रतिमा ही नेहमी खांद्यावर नांगर घेतलेली दाखवली जाते - यावरूनच समजून येते की भारतातील शेतकऱ्यांमध्ये बलरामाला दैवताचे स्थान होते. उत्तर भारतामध्ये शेतकर्‍यांमध्ये बलराम हे नाव प्रचलित आहे. उदाहरणार्थ बलराम जाखड हे शेतकरी कुटुंबातील होते. एकेकाळी केंद्रीय कृषिमंत्री होते. महाराष्ट्रात हेच नाव 'बळीराम' असे ठेवले जात असे. बलरामाला शेतकरी कुटुंबांत आदराने बळीराजा असे म्हटले जात असे. साधारण दोनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश सरकारच्या काही चाकरांनी - ब्रिटिशांच्या फायद्यासाठी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू केले. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी राक्षस राजा बलि हाच शेतकऱ्यांचा बळीराजा असल्याचे लिहायला आणि सांगायला सुरुवात केली. सरकारच्या पाठिंब्यामुळे हा ...

पुसदचा इतिहास काय आहे?

Image
पुसद म्हणजे अजिंठा डोंगररांगांच्या प्रदेशात आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळनंतरचे दुसरे मोठे तालुक्याचे ठिकाण. या गावाच्याच नावावरून परिसरातील टेकड्यांना पुसदच्या टेकड्या म्हणतात. यवतमाळ जिल्हा , चित्रस्त्रोत :गुगल पुसदचा असा प्राचीन इतिहास सध्यातरी अज्ञात आहे. पुसदहुन वाकाटक साम्राज्याच्या सर्वसेन शाखेची राजधानी वत्सगुल्म (आजचे वाशीम) ६० किलोमीटर अंतरावर असल्याने कदाचित याच काळात इतिहासाच्या सुरुवातीच्या शतकात हे गाव वसले असावे. पुसदचे जुने नाव पुष्पावंती असे होते ज्याच्या उत्पत्तीबाबत दोन तर्क आहेत ते असे १) हे नाव पुष्पावंती नामक राणीच्या नावावरून पडले (ही राणी कोणत्या वंशातील होती तेही कोणी जाणत नाही). २) हे नाव तेथून वाहणाऱ्या पुष्पगंगा (आजची पूस नदी) नदीच्या नावावरून पडले. यादव काळात हे शहर एक महत्त्वाचे स्थळ असावे कारण काही दशकांपूर्वीपर्यंत येथे यादवकालीन हेमाडपंती बांधणीची मंदिरे चांगल्या अवस्थेत होती (दुर्दैवाने ती आज मोडकळीस आली आहेत). पुसदचे एक हेमाडपंती मंदिर , चित्रस्त्रोत : श्री रजत मुक्कावार गावाच्या परिसरात यादवकालीन अशी महादेवाच...

संभाजी महाराजांना ‘संभाजी' हे नाव देण्यामागे काही कथा आहे का?

मुळात हे नाव आले आहे संस्कृत मधील महादेवाचे नाव शंभू वरून ज्याचा अर्थ होतो स्वयंभू . मराठीत यादव काळात नावामागे सन्मानार्थ जी हा प्रत्यय लावण्याची प्रथा रुजली व शम्भूजी - संभुजी - संभाजी असे नाव पडले . भोसले कुळाचे मूळ कुलदैवत आहे शिखर शिंगणापूर चे शंभू महादेव . या शंभू महादेवाच्या नावावरून शहाजी राजांच्या काकांनी विठोजीराजे भोसल्यांनी त्यांच्या ८ पैकी पहिल्या मुलाचे नाव ठेवले संभाजी . हे संभाजी विठोजी भोसले १६२०-१६२१ दरम्यान दौलताबादला राजमाता जिजाबाईंच्या वडिलांच्या लखुजी जाधवराव यांच्या हातून मारले गेले व जिजाऊ प्रसूत झाल्या ( १६२१ ) म्हणून मुलाचे नाव ठेवले संभाजी . हे संभाजी शहाजी भोसले १६५६-१६५७ च्या दरम्यान कनकगिरीच्या युद्धात अफजलखानाकडून विश्वासघाताने मारले गेले व १६५७ मध्ये सईबाई राणीसाहेबांना पुरंदरावर मूल झाले म्हणून त्याचे नाव ठेवले संभाजी जे पुढे झाले छत्रपती संभाजी महाराज . •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

म्यानमार देशाचे नाव ब्रह्मदेश असे होते का? याचा ब्रह्मदेवाशी काही संबंध आहे का?

Image
हो संबंध आहे (आणि नाही पण!). ब्रम्हदेश नावाच्या उगमाबद्दल इतिहासकारांमध्ये भिन्न भिन्न मतप्रवाह दिसून येतात. भारतामध्ये म्यानमार ह्या देशाला ब्रम्हदेश म्हणून ओळखले जाते. अन्यत्र ह्या देशाला बर्मा म्हणून ओळखले जायचे (अजून पण काही देशांत हेच नाव प्रचलित आहे). ब्रम्हदेश नावाचा एक अर्थ असा निघतो की ब्राम्हणांचा प्रदेश (लँड ऑफ ब्राम्हण) दुसरा अर्थ असा पण निघतो की ब्रम्हदेवाचा प्रदेश (लँड ऑफ ब्रम्हा) अनेक भारतीय इतिहासकार जसे की निहार रंजन रे, कालिदास नाग, इ. ह्या मताचे आहेत की ब्रम्हदेश ह्या नावाचा संस्कृत भाषेशी संबंध आहे. रे ह्यांनी त्यांच्या 'ब्राह्मणीकल गॉड्स इन बर्मा' ह्या पुस्तकामध्ये असे नमुद केले आहे की ब्रम्हदेशातील अनेक जागांची नावे ही संस्कृत मधून घेतलेली आहेत. तसेच स्थानिक मोन लोकांच्या शिलालेखांत ब्रम्हदेशातील ब्राम्हण आणि ब्राम्हण संस्कृतीबद्दल उल्लेख केलेला आढळतो असे पण त्यांचे म्हणणे आहे. तसेच महाभारतामध्ये पण आपल्याला बर्माक आणि शर्माक ह्या दोन देशांच्या नावाचा संदर्भ आढळतो. ही दोन्ही नावे म्हणजे ब्रम्हदेश आणि श्याम...

भारतीय संस्कृतीशी जुळणाऱ्या प्रभागांची नावे

भारतीय संस्कृतीशी जुळणाऱ्या प्रभागांची नावे भारतीयांनी पूर्वी ठेवलेली आहेत . ती म्हणजे श्रीलंका, अरुणाचल प्रदेश, त्रिविष्टप ( तिबेट ), ब्रह्मदेश व चीन . भारतात सर्वात आधी दिवसाची सुरवात ब्रह्म मुहूर्ताची होते. त्यावेळी ज्या प्रभागात सूर्य उगवतो त्यास ब्रह्मदेश म्हटले, इंग्रजांनी ब्रह्मदेशाचा अपभ्रंश बर्मा असा केला. भारतात ज्यावेळी अरुण उगवतो ( अरुण म्हणजे सूर्याचा सारथी, गरुडाचा मोठा भाऊ व जटायू आणि संपातीचा पिता ) त्यावेळी अरुणाचल प्रदेश म्हणजे भारताच्या प्रथम भागात सूर्याचा उदय होतो तो भाग म्हणजे अरुणाचल प्रदेश. ( सूर्योदया आधी अरुण उगवतो.) त्याचप्रमाणे तिबेट ( त्रिविष्टप ) व चीन हे सुद्धा भारतीयांनीच नावे ठेवली आहेत. ( चीनला चिनी लोक QIN किंवा QING असे म्हणतात.

महाराष्ट्रातील कोणत्या गावांची नावे विनोदी आहेत?

Image
' इचलकरंजी ' हे नाव मला उचलकरंजी सारखे वाटून हसू यायचे. विनोदाचे लक्षणच असे की,अपेक्षे पेक्षा विपरीत अनुभव आला की आपण तिथे हसतो. गावाच्या नावातही अशीच गंमत घडते.कधीच अपेक्षा नव्हती अशी गावाची नावे वाचली वा ऐकली की आपण खुदकन हसतो. अशीच काही गमतीशीर गावाची नावे खाली देतो आहे.ती वाचल्यावर नक्कीच तुमच्या गालावर कळी फुलणार आहे.ही विनोदाची मोठी मेजवानी असणार नाही, पण विरंगुळा म्हणून चणे फुटाणे खायलाही काही हरकत नाही ना ? प्रारंभी जिल्हा देऊन पुढे त्या जिल्ह्यातील गावांची गमतीशीर नवे दिली आहेत.करमणुकी बरोबर माहितीत भर. १)ठाणे :--अननस. २) रायगड:--रामराज, सहान. ३)सिंधुदुर्ग :--आई ,भांडकुली, पुरळ, मागवली. ४)जळगाव :--उंदिरखेडा, वेळ, कका, लंगडा आंबा. ५)धुळे :--लकड्या हनुमान, वारूळ, विसरणे, भांडणे, धाडणे, खट्याळ, कुत्तरखांब, हट्टी, ६)नंदुरबार:-- काठी, वैरी, कात्री, शहाणे, लंगडी भवानी, खोल विहीर,खेकडा. ७)नासिक :--भेलपुरी, रगतपुरी, इगतपुरी. ८)अहमदनगर :--दाढ, कृष्णधवल, खर्डा. ९)पुणे :--नवलाख उंबरे, चादर, घोळ, राहू, अंथूरणें, नाव्ही,राख. १०)सातारा :--शेणवडी, वनवास माची,मढे, आंधळी, अटक, ११)कोल्ह...

गावांच्या नावासमोर लावण्यात येणाऱ्या बुद्रुक आणि खुर्द ह्या शब्दांचा अर्थ काय?

Image
🔹बुद्रूक व खुर्द-- काही गावांच्या पुढे खुर्द लिहलं जात तर काही गावांच्या पुढे बुद्रुक. उदा ऐतवडे खुर्द आणि ऐतवडे बुद्रुक. साधारण अशी गावे जुळी असतात. म्हणजे त्या दोन गावांमध्ये जास्त अंतर नसतं. पण वेगवेगळी ओळख निर्माण होण्याइतकं जास्त देखील असतं. यापैकी ज्या गावापुढे बुद्रुक ते गाव मोठ्ठं. बुद्रुक हा बुजुर्ग या फारसी शब्दाचा अपभ्रंश आहे. बुजुर्ग म्हणजे मोठ्ठा किंवा थोरला. तर खुर्द देखील फारसी शब्द आहे. खुर्दचा अर्थ किरकोळ. मुख्य ठिकाणा शेजारी असणारी किरकोळ वस्ती म्हणजे खुर्द. 🔹कसबा व मौजे -पैकी मौजे हा शब्द अरबी आहे. मौजअ अथवा मौझा या अरबी शब्दांवरुन हा शब्द भारतात आला. या शब्दाचा अर्थ गाव असाच होतो. तर दूसरा शब्द कसबा. कसबा हा शब्द उत्तर अमेरिकेतल्या Quasah या शब्दावरुन आला आहे. हे दोन्ही शब्द मुघल आक्रमणासोबत भारतात आले. कसबा या शब्दाचा अर्थ बाजारपेठेचं ठिकाण असा होतो. याचा दूसरा अर्थ मुळ गाव किंवा जूनं गाव असा देखील आहे. http://prahaar.in/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%95/amp/ त...

बेंगळूरू ह्या शहराचे नाव कसे पडले?

Image
बेंगळूरु नाव जवळपास १२०० वर्ष जुने आहे. बेंगळूरु हा शब्द असलेला सर्वात जुना शिलालेख ८ व्या शतकातील आहे. तो शिलालेख बेंगळूरु शहरातील बेगूरु नावाच्या ठिकाणी सापडला होता. त्या शिलालेख बद्दल वर्णन जुन्या कन्नड लिपीमध्ये मूळ शिलालेखाचा फोटो लाल रंगाचा शब्द बेंगळूरु आहे इंग्रजीत तो शिलालेख बेंगळूरु बेंगावालिना ऊरु (a city which has bodyguards) किंवा बेंगागळा ऊरु (बेंगा हे एका वृक्षाचे कन्नडा नाव आहे) किंवा इतर कुठल्या दुसऱ्या गोष्टीवरून आले आहे ज्याबद्दल आज माहिती उपलब्ध नाही. त्यावेळीही बेंगळूरु बागांचे शहर होते आणि त्यावेळी बेंगाची  “ Benga ” trees  मोठी झाडे होती. त्यामुळे बेंगा गळु (बहुवचन) + ऊरु (शेहेर) = बेंगळूरु

आपल्या देशाला भारत हे नाव केव्हा आणि कसे पडले?

महाभारतानुसार आपल्या देशाला भारतवर्ष हे नाव, राजा भरत चक्रवर्ती यांच्या नावावरून पडले. राजा भरत हे भरत राजवंशाचे संस्थापक आणि कौरव आणि पांडवांचे पूर्वज होते. ते दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचे पुत्र होतं. भरत यांनी संपूर्ण देशातील साम्राज्य जिंकून एका संघटीत राज्याची स्थापना केली होती, म्हणून त्यांच्या संपूर्ण साम्राज्याला भारतवर्ष म्हणून ओळख मिळाली. विष्णू पुराणामध्येही याबद्दलचे दाखले मिळतात. विष्णू पुराणानुसार आपल्या देशाला भारतवर्ष नाव तेव्हा देण्यात आले जेव्हा भरतच्या वडिलांनी आपला संपूर्ण राजपाट आपल्या मुलांच्या स्वाधीन करून संन्यास घेतला आणि ते जंगलात निघून गेले. विष्णू पुराणामध्ये एक श्लोक आढळतो. तो असा- उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।। या श्लोकाचा अर्थ आहे, एक असा देश जो समुद्राच्या उत्तरेला आणि बर्फाळ डोंगराच्या दक्षिणेला आहे ज्याला ‘भारतम’ म्हटले जाते आणि येथे भरत वंशाच्या अस्तित्वाचे पुरावे देखील मिळाले आहेत. आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की भरतच्या साम्राज्यामध्ये म्हणजेच भारतववर्षा मध्ये आजचे पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, इर...

भारत देशाला हिंदुस्थान हे नाव कोणी दिले?

इ.स.पू. ३०० सालच्या सुमारास इराणचा सम्राट दरायस याने सिंधू नदी (इंडस्) च्या काठी वसलेल्या समाजव्यवस्थेला सिंधु संस्कृती या नावाने पुकारण्यास सुरुवात केली. याच सिंधु शब्दाचा अपभ्रंश होऊन हिंदू हा शब्द उदयास आला व सिंधू नदीपलीकडील भूमी म्हणून त्या प्रदेशाला हिंदुस्तान असे संबोधले जाऊ लागले. मोगलांच्या शासनकाळामधे हा शब्द जास्त प्रचलित झाल. मोगलांच्या दिल्ली हे केंद्र ( राजधानी? ) असलेल्या अधिराज्याचा, म्हणजे उत्तरी भारताच्या विशाल प्रदेशाचा नामोल्लेख हिंदुस्तान असा केला जाई. हिंदुस्तान या शब्दावरून त्या प्रदेशातील वैदिक धर्माला हिंदू धर्म हे नाव पडले. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••√•••••••••••••••••••• सिंधु नदी पात्राच्या आसपास रहात असल्याने सिंधु संस्कृती उदयास आली होती. पर्शियन भाषेत "स" चा उच्चार "ह" असा होतो. पर्शियन लोकांनी या भागाला हिंदोस्तांन असे संबोधण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे सिंधुवासी असलेले हिंदोस्तानी व पुढे जाऊन त्याचे हिंदुस्थान असे नामकरण झाले. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

भारताला इंडिया हे नाव कोणी दिले? त्यामागचा काय इतिहास आहे?

भारताला सप्तासिंधूchaa प्रदेश म्हटलं जात असे. सिंधू नदी आणि तिच्या आजूबाजूच्या नद्या यांत प्राचीन भारतीय संस्कृती उदयाला आली. या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अरब हिंदू म्हणू लागले. अरबांना स चा उच्चार येत नसे. त्यामुळे सिंधुस्थान चे झाले हिंदुस्थान. आजही चीन मध्ये भारताला इंदू म्हणतात. त्याचा धर्माशी काही संबंध नाही. ही भौगोलिक संज्ञा आहे. अरब आणि युरोपीय लोकांचे व्यापारी संबंध होते. या अरबांनी युरोपीय लोकांना हिंदू संस्कृतीची माहिती दिली. यातून इंडूज म्हणजे सिंधू नदी परिचित झाली. याच सिंधू म्हणजेच इंदूज वरून इंडिया ही संज्ञा अस्तित्वात आली. याविषयी खूप चांगले विश्लेषण हवे असल्यास संजीव सन्याल यांचं ‘The Land Of Seven Rivers‘ नावाचं एक खूप छान पुस्तक आहे, ते वाचा. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• मुख्य न्यायमूर्ती गजेंद्रगडकर आणि इतर चार न्यायमूर्ती यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठाने १४ / १/ १९६६ रोजी 'हिंदू धर्म' या विषयावर एक अत्यंत महत्वाचा निर्णय दिला की, "हिंदू हा धर्म नसून जीवनपद्धती आहे". तो संपूर्ण निर्णय मी नु...

विदर्भाला 'विदर्भ' हे नाव कसे पडले?

Image
आज ज्या भागाला वीदर्भ म्हटले जाते तो पयर्न पणे वीदर्भ नाही। गोंदिया जिल्हा आणि भंडारा,चंद्रपूर, गडचिरोली हे चार जिल्हे विदर्भ नाहीत। असो ही प्रस्तावना यासाठी केली की दर्भ नावाचे एक गवत असते त्याला गोंदिया भगत पड्यार असे म्हणतात। याला गणपतीच्या दिवसात पांढरी कापसाच्या सारखी असणारी फुले येतात। हे गवत म्हणजे सरळ लांब अगदी 3 ते 4 फूट इतके उंच होते। थोडे कडक असते व अगदी सरळ उभे राहते बासा / बांबू सारखे । या गवताचा उपयोग पूजेत केला जातो। अगदी गीतेत देखील याचा संदर्भ मिळतो। याला चटई सारखे विणुन आसन पण तयार करता येते। याला पिळून दोरी पण करता येते। दोरी बरी टिकते पण शेतातील कामात उपयोग होतो। तर वी - दर्भ याचा अर्थ ज्या देशात दर्भ होत नाही तो भाग /प्रदेश। हे खरे आहे की वर्धा , नागपूर अमरावती इत्यादी भागात दर्भ जातीचे गवत दिसत नाही पण इथे देखील ते पूजेत वापरतात। अजूनही नागपूरचे गुरुजी ,पुजारी हे गवत या गोंदिया, भंडारा भागातून नेतात पूजेसाठी। असो मूळ विदर्भात दर्भ होत नाही यासाठी त्याला विदर्भ म्हटले जाते असे मला एक गुरुजींनी सांगितले आणि याच पडताळा करून मी खात्री केली आहे। हे गवत विदर्भ ...

'मराठवाडा' हे नाव कसे पडले?

‘मराठवाडा’ हे खऱ्या अर्थाने मराठी माणसाचे माहेरघर आहे. गोदावरी नदी मराठवाड्यातून वाहते. मानवाने वस्ती केली ती नदी, तलाव अशा जलाशयाच्या काठी. मराठी संस्कृती बहरली ती गोदावरीच्या काठावर. प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ, लेखिका आणि विचारवंत इरावती कर्वे यांनी लिहिले आहे की, “महाराष्ट्राचा सांस्कृतिक गाभा गोदातीर आहे. सांस्कृतिक दृष्टीने प्राचीन महाराष्ट्र म्हणजे बृहत्तर मराठवाडाच होता. (संदर्भ : मराठी लोकांची संस्कृती) पाणिनीच्या अष्टअध्यायीत ५५ भारतीय जनपदांची नोंद आहे, त्यात ‘अश्मक’ हे दक्षिणेतील महत्वाचे जनपद होते आणि त्याची राजधानी पैठण होती. त्यानंतर सातवाहनांच्या दोन राजधान्यांपैकी पैठण हे एक होते. त्यानंतर राष्ट्रकूट आणि यादव या मराठी राजांनी याच गोदाकाठच्या भागातून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. एकंदरीत पाहता हा भाग म्हणजे मराठी माणसाचे मूळ वसतिस्थान आहे. म्हणून मराठी माणसाचे घर म्हणजे वाडा या अर्थी गोदातीरावरील या भागाला ‘मराठवाडा’ असे नाव पडले. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• आताचा मराठवाडा विभाग हा पूर्वी निझामाच्या हैदराबाद राज्यात ह...

आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव का देण्यात आले असावे?

मराठी माणसांनी दिलेल्या लढ्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरातचे द्विभाषिक राज्य मोडण्याची अधिकृत घोषणा ८ मार्च १९६० रोजी करण्यात आली. त्यासाठी जेव्हा २३ एप्रिल रोजी लोकसभेत विधेयक मांडण्यात आले, तेव्हा त्यात ‘बॉम्बे राज्य’ आणि ‘गुजरात राज्य’ अशी दोन राज्य निर्माण करण्याची तरतूद होती. तेव्हा खासदार बॅ. नाथ पै, एस. एम. जोशी आणि आचार्य अत्रे आदी नेत्यांनी ‘महाराष्ट्र’ नावाचा आग्रह धरला. त्याला इतर भाषिकांचा खूप विरोध झाला. ‘भारत हे एक राष्ट्र असताना त्यात आणखी वेगळे महाराष्ट्र कशाला?’ असा युक्तिवाद करण्यात आला. शेवटी काँग्रेस श्रेष्ठींनी नाखुषीने ‘महाराष्ट्र’ या नावाला संमती दिली. मराठी लोकांनी आपल्या राज्याला “महाराष्ट्र’ असे नाव देण्याचा आग्रह का धरला, याला इतिहास आहे. याची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी प्रथम आपण ‘राष्ट्र’ ही संकल्पना आणि ‘राज्य’ आणि ‘राष्ट्र’ यातील फरक समजून घेतला पाहिजे. ‘राज्य’ ही त्यातील नागरिकांचे नियमन आणि नियंत्रण करणारी संस्था असते. या नागरिकांत जेव्हा ऐक्यभावना निर्माण होते, तेव्हा राज्याचे राष्ट्र होते. इंग्रज अधिकाऱ्यांनी सुद्धा मराठयांची ओळख ‘राष्ट्र’ म्हणून स्वीका...

'कोकण' हे नाव कसे पडले?

संस्कृत भाषेतील 'कोण' (कोपरा) आणि 'कण' (भाग) हे दोन शब्द मिळून कोंकण हा शब्द उदयास आला असा एक समज आहे. स्कंदपुराणामधल्या सह्याद्रीखंडात सांगितल्याप्रमाणे पूर्वीच्या काळी परशुरामाने एक बाण समुद्रामध्ये मारला आणि जिथपर्यंत तो बाण समुद्रामध्ये पोचला तिथपर्यंत समुद्रदेवतेला मागे सरण्याची आज्ञा केली. ह्याच्यातून जो नवीन भूभाग उत्पन्न झाला त्याला सप्त कोंकण बोलल गेलं. सप्त कोकणचा अर्थ 'पृथ्वीचा / भूमीचा तुकडा' किंवा 'पृथ्वीचा कोपरा' किंवा 'कोपऱ्यातला तुकडा' असा होतो. १५व्या शतकातल्या काही नोंदीमध्ये कोकणदेशा असा उल्लेख आढळतो. ७व्या शतकामध्ये भारताला एका चिनी प्रवाशाने भेट दिलेली त्याने पण ह्या प्रदेशचा उल्लेख कोकणदेशा असा केला आहे. इतकं असून पण कोकण ह्या शब्दाचा उगम नक्की कसा झाला ह्या बद्दल निश्चित असा निष्कर्ष काढता येत नाही. सप्तकोकणचा उल्लेख भारतीय इतिहासामध्ये अनेक ठिकाणी झालेला आढळून येतो. काही ठिकाणी तळघाट असा पण कोकणचा उल्लेख केला गेला आहे. [1]   [2] तळटीपा [1]  https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer...

मुंबई हे नाव कोणी, कसे आणि कधी ठेवले?

Image
मुंबई हे नाव कोणी, कसे आणि कधी ठेवले? युरोपियन लोकांमध्ये एका पोर्तगिज भ्रमणकर्त्याने लिहिलेल्या "लेंदस दा इंज्या" (भारताच्या सुरस गोष्टी) ह्या पुस्तकात मुंबईचं नाव पहिल्यांदा आढळतं. 1508 मध्ये लिहिलेल्या ह्या पुस्तकात बॉम्बें (Bombaim) असा उल्लेख आहे. 1517 साली एका दुसऱ्या पोर्तगिजाने " टाना-मुईअंबु " बद्दल काही माहिती दिली आहे. ह्याचा अर्थ ठाणे-मुंबई समजला जातो. त्यानंतर अनेक ठिकाणी मोंबे, मोनबे, बूनबे, बोम बहिया असे वेगवेगळे उल्लेख सापडतात. गुजरात मध्ये मुसलमान राज्य करत असताना ते ह्या जागेला “मनबई” म्हणत होते. पोर्तुगीज लोक फिरत असताना रहिवाश्यांबरोबर जास्त संवाद साधत नसत. त्यामुळे "लेंदस दा इंज्या" मधल्या उल्लेखापेक्षा गुजरात मधल्या मुसलमान लोकांचे म्हणणे अधिक योग्य वाटते. बॉम्बे शब्द "बॉम् बहीया" ह्या शब्दांवरून घेतला आहे. त्यांचा अर्थ होतो "चांगला उपसागर." मुंबईचे आधीचे रहिवाशी आगरी आणि कोळी जातीचे लोक तसेच त्यांच्या लगेच नंतर आलेले पाठारे प्रभु सगळेच ह्या जागेला मुंबईच म्हणतात. ह्यात काहीच शंका बाळगण्याची गरज नाही की ह्या शहराचे...