संभाजी महाराजांना ‘संभाजी' हे नाव देण्यामागे काही कथा आहे का?

मुळात हे नाव आले आहे संस्कृत मधील महादेवाचे नाव शंभू वरून ज्याचा अर्थ होतो स्वयंभू .

मराठीत यादव काळात नावामागे सन्मानार्थ जी हा प्रत्यय लावण्याची प्रथा रुजली व शम्भूजी - संभुजी - संभाजी असे नाव पडले .

भोसले कुळाचे मूळ कुलदैवत आहे शिखर शिंगणापूर चे शंभू महादेव .

या शंभू महादेवाच्या नावावरून शहाजी राजांच्या काकांनी विठोजीराजे भोसल्यांनी त्यांच्या ८ पैकी पहिल्या मुलाचे नाव ठेवले संभाजी .

हे संभाजी विठोजी भोसले १६२०-१६२१ दरम्यान दौलताबादला राजमाता जिजाबाईंच्या वडिलांच्या लखुजी जाधवराव यांच्या हातून मारले गेले व जिजाऊ प्रसूत झाल्या ( १६२१ ) म्हणून मुलाचे नाव ठेवले संभाजी .

हे संभाजी शहाजी भोसले १६५६-१६५७ च्या दरम्यान कनकगिरीच्या युद्धात अफजलखानाकडून विश्वासघाताने मारले गेले व १६५७ मध्ये सईबाई राणीसाहेबांना पुरंदरावर मूल झाले म्हणून त्याचे नाव ठेवले संभाजी जे पुढे झाले छत्रपती संभाजी महाराज .

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


Comments

Popular posts from this blog

पुसदचा इतिहास काय आहे?

'कोकण' हे नाव कसे पडले?

महाराष्ट्रातील कोणत्या गावांची नावे विनोदी आहेत?