आपल्या देशाला भारत हे नाव केव्हा आणि कसे पडले?
महाभारतानुसार आपल्या देशाला भारतवर्ष हे नाव, राजा भरत चक्रवर्ती यांच्या नावावरून पडले. राजा भरत हे भरत राजवंशाचे संस्थापक आणि कौरव आणि पांडवांचे पूर्वज होते. ते दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचे पुत्र होतं.
भरत यांनी संपूर्ण देशातील साम्राज्य जिंकून एका संघटीत राज्याची स्थापना केली होती, म्हणून त्यांच्या संपूर्ण साम्राज्याला भारतवर्ष म्हणून ओळख मिळाली.
विष्णू पुराणामध्येही याबद्दलचे दाखले मिळतात. विष्णू पुराणानुसार आपल्या देशाला भारतवर्ष नाव तेव्हा देण्यात आले जेव्हा भरतच्या वडिलांनी आपला संपूर्ण राजपाट आपल्या मुलांच्या स्वाधीन करून संन्यास घेतला आणि ते जंगलात निघून गेले.
विष्णू पुराणामध्ये एक श्लोक आढळतो. तो असा-
उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।।
या श्लोकाचा अर्थ आहे,
एक असा देश जो समुद्राच्या उत्तरेला आणि बर्फाळ डोंगराच्या दक्षिणेला आहे ज्याला ‘भारतम’ म्हटले जाते आणि येथे भरत वंशाच्या अस्तित्वाचे पुरावे देखील मिळाले आहेत.
आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की भरतच्या साम्राज्यामध्ये म्हणजेच भारतववर्षा मध्ये आजचे पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, इराण, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गीस्तान, रशिया, तुर्कमेनिस्तान, उत्तर-पश्चिम तिबेट, नेपाळ आणि बांग्लादेश सर्व समाविष्ट होते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
‘भारत’ किंवा ‘भारतवर्ष’ हे नाव पौरव वंशाचे सम्राट दौषनिती भरत यांच्यावरून पडल्याचे म्हटले जाते. भरत यांनी चक्रवर्ती साम्राज्य स्थापन केले होते. त्यांनी या देशात राजकीय एकता आणली, म्हणून या देशाला भारत म्हणतात, असे म्हटले जाते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Comments
Post a Comment