मुंबई हे नाव कोणी, कसे आणि कधी ठेवले?
मुंबई हे नाव कोणी, कसे आणि कधी ठेवले?
युरोपियन लोकांमध्ये एका पोर्तगिज भ्रमणकर्त्याने लिहिलेल्या "लेंदस दा इंज्या" (भारताच्या सुरस गोष्टी) ह्या पुस्तकात मुंबईचं नाव पहिल्यांदा आढळतं. 1508 मध्ये लिहिलेल्या ह्या पुस्तकात बॉम्बें (Bombaim) असा उल्लेख आहे.
1517 साली एका दुसऱ्या पोर्तगिजाने " टाना-मुईअंबु " बद्दल काही माहिती दिली आहे. ह्याचा अर्थ ठाणे-मुंबई समजला जातो.
त्यानंतर अनेक ठिकाणी मोंबे, मोनबे, बूनबे, बोम बहिया असे वेगवेगळे उल्लेख सापडतात. गुजरात मध्ये मुसलमान राज्य करत असताना ते ह्या जागेला “मनबई” म्हणत होते.
पोर्तुगीज लोक फिरत असताना रहिवाश्यांबरोबर जास्त संवाद साधत नसत. त्यामुळे "लेंदस दा इंज्या" मधल्या उल्लेखापेक्षा गुजरात मधल्या मुसलमान लोकांचे म्हणणे अधिक योग्य वाटते. बॉम्बे शब्द "बॉम् बहीया" ह्या शब्दांवरून घेतला आहे. त्यांचा अर्थ होतो "चांगला उपसागर."
मुंबईचे आधीचे रहिवाशी आगरी आणि कोळी जातीचे लोक तसेच त्यांच्या लगेच नंतर आलेले पाठारे प्रभु सगळेच ह्या जागेला मुंबईच म्हणतात. ह्यात काहीच शंका बाळगण्याची गरज नाही की ह्या शहराचे नाव काय.
इथे मुंबा देवीचे मंदिर असल्यामुळे ह्या जागेला मुंबई म्हटले जाते.
पहिल्यांदा ह्या शहराला "मुंबई" कोणी आणि कधी म्हटलं ह्या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही कारण भारतात आपण प्रत्येक गोष्टीचे लेखी रेकॉर्ड ठेवत नव्हतो.
शहराचे सध्याचे नाव देवी मुंबादेवी पासून आले आहे. हे मंदिर देवी अंबाच्या सन्मानार्थ बांधले गेले. मुंबदेवी मंदिर सहा शतके जुने आहे. प्रथम मुंबदेवी मंदिर बोरी बंदर येथे वसलेले होते आणि 173 9 आणि 1770 च्या दरम्यान नष्ट झाले असल्याचे मानले जाते. विनाशानंतर भुल्लश्वर येथे त्याच ठिकाणी एक नवीन मंदिर उभारण्यात आले. देवीने मातृभूमी व्यक्त केली आणि ती अजूनही उत्तर व दक्षिणेकडील हिंदूंच्या हिंदू लोकसंख्येची पूजा करतात. 1740 च्या सुमारास विक्टोरिया टर्मिनस स्टेशन पूर्वी कोळी मासेमारांनी बांधलेले मूळ मंदिर पाडले गेले होते आणि त्या ठिकाणी फणसी तालाओ येथे नवीन मंदिर उभारण्यात आले होते. आधुनिक मंदिरामध्ये चांदीच्या किरीट, नाक स्टड आणि सोनेरी हार असलेली वस्त्रे घातलेल्या देवी मुंबादेवीची प्रतिमा आहे. डाव्या बाजुला मोरांवर बसलेल्या अन्नपूर्णाचा दगड आहे. मंदिराच्या समोर एक वाघ, देवीचा वाहक आहे.
तळटीपा
आज जिथे "छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस" आहे त्या जागी पूर्वी एका देवीचं देऊळ होतं. त्या देवीचं नाव मुंबा देवी. तिला "मुंबा आई" म्हणायचे आणि तिच्याच नावावरून आपल्या शहराला मुंबा + आई = मुंबई असं नाव पडलंय.
ते देऊळ पोर्तगिजांनी पाडलं आणि इंग्रजांनी त्याच देवीचं देऊळ बांधायला दुसरी जागा दिली. तिथेच पायधुणीच्या जवळ झवेरी बाजारच्या इथे आज मुंबा देवीचा देऊळ आहे.
मुंबईत बऱ्याच ठिकाणांची नावे ही परदेशी का आहेत? उदा. सांताक्रूझ, बँड्रा, विलेपार्ले, कोलाबा, कफ परेड, वर्सोवा, इ. त्यांची नावे अशी का ठेवली?
येस बॉस!
जर तुम्ही मुंबईचा इतिहास पाहिलात तर तुम्हाला कळेल की इथे एकेकाळी कोळी राजा भीमदेव ह्यांचे राज्य होते. त्यांची राजधानी माहीम येथे होती आणि राज्य सायन पर्यंत पसरले होते. म्हणून सायनचे मराठी नाव शीव आहे — कारण ते शीवेवर (सीमेवर) होते.
नंतर मुंबई गुजरात सल्तनत ने स्वतःच्या ताब्यात घेतली. त्यांना हरवून पोर्तुगिज लोक राज्य करू लागले. पोर्तुगिजांच्या एका राजकन्येचे लग्न इंग्रज राजकुमाराशी जमले तेव्हा मुंबई इंग्रजांना हुंड्यात मिळाली.
म्हणून इथल्या काही जागांची नावे परदेशातल्या भाषेत आहेत. पण ह्या जागांच्या नावांमागे मनोरंजक गोष्टी आहेत. त्या अश्या:
सांताक्रूझ ह्या शब्दाचा पोर्तुगिज भाषेत “पवित्र क्रॉस” असा अर्थ लागतो. ह्या ठिकाणी एक 150 वर्ष जुना क्रॉस आहे.
बँड्रा चे मराठी नाव वांद्रे आहे. ह्या नावामागे दोन कारणे असू शकतात. एक तर इथे अनेक वानरे होती म्हणून वांद्रे. किंवा इथे एक बंदर होते म्हणून बांद्रा. पोर्तुगिजांना हे नाव उच्चारता येईना म्हणून ते बँड्रा म्हणू लागले. ते लोक मुळात बंगाली लोकांसारखे “व” ला “ब” म्हणतात. वसई ला “बॅसीन” म्हणतात त्यावरून समजता येते.
मी माझ्या इंग्रजी उत्तरात विलेपार्ले चा शब्दशः अर्थ “पार्लेचे गाव” असा सांगितले आहे. पण ते इतके सोपे नाही आहे. हे नाव विलेश्र्वर आणि पार्लेशर ह्या दोन देवस्थानांवरून घेतले आहे. आणि ह्या जागेचे नाव पार्ले-जी ला देण्यात आले आहे.
कोलाबा म्हणाल तर मराठीच नाव आहे. रायगड जिल्ह्यात अलिबागच्या जवळ एक कुलाबा नावाचे गाव आहे. पूर्वी रायगड जिल्ह्याला कुलाबा जिल्हा म्हणायचे. मुंबईचे कोलबा एक वेगळे द्वीप होते ज्याला कोळी लोक “कोलाभात” म्हणायचे. नंतर नंतर ला ह्या जागेला “कंदील” म्हणायला लागले आणि शेवटी परदेशी लोकांनी त्याचे “कोलाबा” केले.
कफ परेड ची जागा समुद्राला हटवून घेतली आहे. बॉम्बे सिटी इम्प्रुवमेंट ट्रस्ट च्या “टी डब्ल्यू कफ” ह्या इंग्रज अधिकाऱ्याचे नाव ह्या जागेला दिले आहे.
वर्सोवा सुद्धा मराठीच नाव आहे. ह्या जागेचे मूळचे नाव “विसाव” असे सांगितले जाते. कालांतराने विसाव्याचे वर्सोवात रुपांतर झाले.
एलफिन्स्टन रोड - जॉन एलफिन्स्टन नावाचा एक इंग्रज अधिकारी मुंबईचा राज्यपाल होता.
चर्नी रोड - इथे गाई गुरे चारायची म्हणून “चर्णी” रोड.
कॉटन ग्रीन - इथे एक कापूस एक्सचेंज हिरवळीवर बांधले होते म्हणून “कॉटन” आणि “ग्रीन.”
करी रोड - रेल्वे अधिकारी सी करी च्या नावावरून
सँढर्स्ट रोड - विल्यम मॅन्सफिल्ड (फर्स्ट विस्काउंट सँढर्स्ट) ह्या इसमाच्या नावावरून
रे रोड - इंग्रज अधिकारी आणि मुंबईचा राज्यपाल डोनाल्ड जेम्स मॅके (द लॉर्ड रे) ह्या माणसाच्या नावावरून
ग्रँट रोड - इंग्रज अधिकारी आणि मुंबईचा राज्यपाल रॉबर्ट ग्रँट च्या नावावर हे नाव ठेवले आहे.
अँटाॅप हील - ह्या डोंगराचा मालक एक अंतोबा नावाचा माणूस होता. इंग्रज लोक त्याला अँटाॅप उच्चारायचे म्हणून.
चर्चगेट - इथे सेंट थॉमस कॅथेड्रल आहे म्हणून “चर्च” आणि फोर्ट किल्ल्याचे तीन प्रवेशद्वार होते म्हणून “गेट.”
आठवणीने विचारल्याबद्दल धन्यवाद. ह्यातले काही हर्षल मोदींच्या इंग्रजी उत्तरावरून आहे आणि बरेचसे विकिपीडिया वरून.
Harshal Modi's answer to What is the history behind naming the stations in Mumbai?
लक्ष्मण हरिश्चंद्रजी अजिंक्य (१७८९ - १८५८)
ह्यांनी १८४१ मध्ये जलवाहतुकिसाठी हा धक्का बांधला. मुंबईत कृत्रिमरीत्या जलवाहतुकीसाठी बांधला गेलेला हा पहिलाच धक्का होता. भाऊ या टोपणनावाने त्यांना सर्व ओळखायचे आणि हा धक्का बांधल्यावर धक्क्यासाठी त्यांचे टोपणनाव वापरणे प्रचलित झाले आणि भाऊचा धक्का म्हणून आजतागायत हे नामकरण कायम आहे. भाऊंचा जन्म मूळ मुंबईचे रहिवाशी असणाऱ्या पाठारे प्रभू घराण्यात झाला. ब्रिटिश सरकारने त्या काळात मालाची आणि प्रवाश्यांची ने आण करण्यासाठी खाजगी क्षेत्रातील लोकांना धक्का बांधण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा देऊ केली. भाऊंनी जे आधीच उद्यमशील होते त्यांनी या संधीचा प्रथम फायदा घेतला व हा धक्का तयार केला. आजही माल आणि प्रवासी वाहतुकीसाठी या धक्क्याचा उपयोग केला जातो. इथून मोरा, रेवस, एलिफंटा येथे जाण्यासाठी प्रवासी फेरी उपलब्ध असते.
भाऊंच्या कार्याविषयी अधिक माहिती आणि रंजक गोष्टी खालील बातम्यांच्या दुव्यांमधून आपल्याला कळेल :
Comments
Post a Comment