भारताला इंडिया हे नाव कोणी दिले? त्यामागचा काय इतिहास आहे?
भारताला सप्तासिंधूchaa प्रदेश म्हटलं जात असे. सिंधू नदी आणि तिच्या आजूबाजूच्या नद्या यांत प्राचीन भारतीय संस्कृती उदयाला आली. या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अरब हिंदू म्हणू लागले. अरबांना स चा उच्चार येत नसे. त्यामुळे सिंधुस्थान चे झाले हिंदुस्थान. आजही चीन मध्ये भारताला इंदू म्हणतात. त्याचा धर्माशी काही संबंध नाही. ही भौगोलिक संज्ञा आहे.
अरब आणि युरोपीय लोकांचे व्यापारी संबंध होते. या अरबांनी युरोपीय लोकांना हिंदू संस्कृतीची माहिती दिली. यातून इंडूज म्हणजे सिंधू नदी परिचित झाली. याच सिंधू म्हणजेच इंदूज वरून इंडिया ही संज्ञा अस्तित्वात आली.
याविषयी खूप चांगले विश्लेषण हवे असल्यास संजीव सन्याल यांचं ‘The Land Of Seven Rivers‘ नावाचं एक खूप छान पुस्तक आहे, ते वाचा.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मुख्य न्यायमूर्ती गजेंद्रगडकर आणि इतर चार न्यायमूर्ती यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठाने १४ / १/ १९६६ रोजी 'हिंदू धर्म' या विषयावर एक अत्यंत महत्वाचा निर्णय दिला की, "हिंदू हा धर्म नसून जीवनपद्धती आहे". तो संपूर्ण निर्णय मी नुकताच माझ्या अभ्यासासाठी वाचला. त्यातील वाक्य खाली देत आहे :-
"The view generally accepted by scholars appears to be that the word 'Hindu' is derived from the river 'Sindhu'. The Persians pronounced this word as 'Hindu'. The Greeks who probably gained their first ideas of India from the Persians, dropped the hard aspirates and called the Hindus "Indoi".
या वरून असे दिसते की, पर्शियन लोकांनी 'सिंधू'चे 'हिंदू' केले आणि ग्रीकांनी 'हिंदू'चे 'इंदोई' केले आणि त्याचे पुढे 'इंडिया' झाले.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Comments
Post a Comment