आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव का देण्यात आले असावे?
मराठी माणसांनी दिलेल्या लढ्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरातचे द्विभाषिक राज्य मोडण्याची अधिकृत घोषणा ८ मार्च १९६० रोजी करण्यात आली. त्यासाठी जेव्हा २३ एप्रिल रोजी लोकसभेत विधेयक मांडण्यात आले, तेव्हा त्यात ‘बॉम्बे राज्य’ आणि ‘गुजरात राज्य’ अशी दोन राज्य निर्माण करण्याची तरतूद होती. तेव्हा खासदार बॅ. नाथ पै, एस. एम. जोशी आणि आचार्य अत्रे आदी नेत्यांनी ‘महाराष्ट्र’ नावाचा आग्रह धरला. त्याला इतर भाषिकांचा खूप विरोध झाला. ‘भारत हे एक राष्ट्र असताना त्यात आणखी वेगळे महाराष्ट्र कशाला?’ असा युक्तिवाद करण्यात आला. शेवटी काँग्रेस श्रेष्ठींनी नाखुषीने ‘महाराष्ट्र’ या नावाला संमती दिली.
मराठी लोकांनी आपल्या राज्याला “महाराष्ट्र’ असे नाव देण्याचा आग्रह का धरला, याला इतिहास आहे. याची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी प्रथम आपण ‘राष्ट्र’ ही संकल्पना आणि ‘राज्य’ आणि ‘राष्ट्र’ यातील फरक समजून घेतला पाहिजे. ‘राज्य’ ही त्यातील नागरिकांचे नियमन आणि नियंत्रण करणारी संस्था असते. या नागरिकांत जेव्हा ऐक्यभावना निर्माण होते, तेव्हा राज्याचे राष्ट्र होते.
इंग्रज अधिकाऱ्यांनी सुद्धा मराठयांची ओळख ‘राष्ट्र’ म्हणून स्वीकारली होती. इंग्रज अधिकारी आणि लेखक ऍकवर्थ याने लिहिले की “या देशातील इतर लोक जाती, पंथ, धर्म, जमाती आदी कारणांमुळे संघटित झालेले दिसतात, परंतु मराठे हे एक राष्ट्र आहे आणि त्याचा ब्राह्मणांपासून कुणब्यांपर्यंत सर्वाना अभिमान आहे”. वॉरेन हेस्टिंग्ज असे म्हणाला होता की, “हिंदुस्तानातील आणि दख्खनेतील सर्व लोकांमध्ये केवळ मराठे असे आहेत की, ज्यांच्यापैकी प्रत्येकाच्या मनावर राष्ट्रभावना कोरलेली आहे”. ऑर्थर वेलस्ली म्हणाला होता की, “स्वतःची विशिष्ट ओळख आणि भाषा असलेले मराठे ही भारतातील एकमेव राजकीय शक्ती होती, जी राष्ट्रीय भावनेने जोपासली होती”.
(दुर्दैवाने राजकारण्यांनी मतांसाठी आज मराठी समाजाच्या चिरफाळ्या उडवल्या आहेत.)
चौथ्या शतकात ‘महाराष्ट्र’ या शब्दाचा उल्लेख प्रथम आढळतो. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरण या गावी सापडलेल्या स्तंभलेखात हा उल्लेख आहे. वरहमिहिराच्या इ.स. ५०५ मधील बृहतसंहितेत ‘महाराष्ट्रीय’ या अर्थी ‘महाराष्ट्रा:’ हा शब्द आला आहे. त्याच काळात दंडी कवीने ‘महाराष्ट्रातील भाषा मुख्यतः प्राकृत आहे’ असे लिहिले आहे. महानुभाव पंथाच्या साहित्यातही सातशे वर्षांपूर्वी ‘महाराष्ट्र’ हा शब्द आढळतो. ‘महाराष्ट्र राज्य’ हे शब्द ‘जेधे करीना’ आणि ‘शिवचरित्रप्रदीप’ मध्ये आले आहेत. समर्थ रामदास स्वामींनी ‘मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।’ असा प्रेरक संदेश दिला.
‘महाराष्ट्र’ या नावाला अशी पार्श्वभूमी असल्यामुळे मराठी माणसाने त्या नावाचा आग्रह धरला आणि काँग्रेस श्रेष्ठींनी तो मान्य करावा लागला. शेवटी १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव का देण्यात आले असावे?
शिवाजी महाराज
संभाजी राजे
राजर्षी शाहू महाराज
थोरले बाजीराव पेश्वे
थोरले माधवराव पेश्वे
रधुनाथराव (मला आवडत नसले तरी)
समशेर बहाद्दर
अहिल्याबाई होळकर
ज्योतिबा फुले
बाबासाहेब आंबेडकर
बाळासाहेब ठाकरे
हे सगळे महापराक्रमी लोक होते. ज्या राज्यातुन हे महारथी जन्माला आले त्या राज्याला महारथ्यांचं महा-राष्ट्र नाही म्हणायचं तर अजुन काय म्हणायचं?
आपल्या राज्याला नक्की महाराष्ट्रच का म्हणतात हे खरं खरं कोणी सांगू शकेल असं वाटत नाही पण काही थिअऱ्या आहेत:
१. जुन्या काळी लहान राजाच्या राज्याला “राष्ट्रीका” म्हणायचे म्हणून महाराष्ट्रीका = मराठा = महाराष्ट्र
२. महारथी = मराठा = महाराष्ट्र… कारण एकेकाळी तमिळनाडूच्या जिंजी पासून ते अफगाण सिमेवर अटकपर्यंत मराठा साम्राज्य पसरलं होतं. आणि दिल्लीत राज्य करणारा मुघलसुद्धा मराठ्यांच्या दयेवर राज्य करायचा.
३. महा = मोठं + राष्ट्र = महाराष्ट्र
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
महार नावानेच महाराष्ट्र नाव झाले हे खरे आहे का?
ज्यांनी सातवाहनांची शासनपद्धती अभ्यासली आहे त्यांना हे कळेल.
सातवाहनकाळात राजन म्हणजे सातवाहन राजा सर्वात पहिला येत असे. त्यांनी आपल्या खाली काही वंशपरंपरागत खाती निर्माण केली होती. त्यात भोज, महाभोज, रठ्ठी (राष्ट्री) आणि महारठ्ठी (महाराष्ट्री) अशी खाती किंवा पदं होती. पट्टकील हे ग्रामपातळीवरचं पद ज्याचं पुढे पाटील किंवा गुजरातेत पटेल झालं.
ही पदं नर्मदा व तुंगभद्रेच्या मधील प्रदेशात वापरात होती. सातवाहन काळाअगोदरचे या पदांबाबतीत पुरावे नाहीत. महाराष्ट्री अथवा महारठ्ठी या पदाच्या लोकांवरुन महाराष्ट्र हे नाव विकसित झालं. कदाचित हे महारठ्ठीच आताच्या मराठ्यांचे पुर्वज असावेत (अंशतः कारण बरेच क्षत्रिय राजकारणानिमित्त इथेतिथे फिरत व स्थायिक होत. माझे चालुक्य पुर्वज पहिले कर्नाटक मग गुजरात मग महाराष्ट्र असे फिरुन आले आहेत.
महार शब्दाची उत्पत्ती माहीत नाही पण त्यांची आडनावं आणि काही प्रथा मराठ्यांसारख्या आहेत. अर्थात मला खात्रीलायक काही बोलता येणार नाही कारण महार जातीचा उल्लेख फार नंतरचा आहे.
महाराष्ट्री असा सातवाहनांच्या प्राकृत भाषेचा उल्लेख वररुचि या व्याकरणकाराने त्याच्या प्राकृत प्रकाश या ग्रंथात केला आहे व हा ग्रंथ किमान सहाव्या शतकातील आहे. या ग्रंथात त्याने महाराष्ट्रीचे व्याकरण आधारभुत मानलं आहे. अनेक ठिकाणी तो “शेषम् महाराष्ट्रीवत्” असं म्हणतो. म्हणजेच त्याच्या काळात महाराष्ट्री खुप महत्त्वाची भाषा होती.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
खूप अवघड आहे या प्रश्नाचे उत्तर कारण काही महार लोक म्हणतात की महार नावरुणच महाराष्ट्र हे नाव पडले आहे परंतु महारेतर समाजाच्या लोकांचं वेगळं गृहितक आहे, ऐतिहािकदृष्ट्या महाराष्ट्र हा कधीच संयुक्त नव्हता विद्यमान महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राचा सर्वप्रथम उल्लेख फार प्राचीन काळापासून महाराष्ट्र तीन राज्यांत विभागले गेले आहे.
अशोकच्या काळात महाराष्ट्र इतिहासात सर्वप्रथम ओळखला जातो. त्यात नमूद आहे
अशोकने भारताच्या विविध भागात पाठविलेल्या मिशनaries्यांच्या संदर्भात महावंशात
बौद्ध धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने. पण त्यानंतर पाली साहित्य त्रयीबद्दल बोलतेफार
महाराष्ट्रीका किंवा तीन महाराष्ट्र. याचा अर्थ असा आहे की फार प्राचीन काळापासून तेथे तीन आहेत । असे मी नाही तर स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या 'thoughts on linguistic states' या पुस्तकात मान्य केले आहे जर वरील लेखाचं स्पष्टीकरण द्यायचे असल्यास महाराष्ट्रात अनेक राजवटी नीं राज्य केले होते जसे की काही उत्तर भारतीय राजवट(यादव देवगिरी) ,तर कधी दक्षिण भारतीय राजवट उदा - चालुक्य, भोज,राष्ट्रकुट, फार प्राचीन काळापासून मोठ्या शासकांच्या अधिपत्याखाली असलेल्या काही प्रकारच्या अल्पवयीन राज्यकर्त्यांना 'भोज' म्हणून संबोधले जायचे, पण नंतरच्या काळात 'महा' या शब्दाची 'महान' असे उपस्थिती लावण्याची प्रथा झाली.
कुडा येथील गुहेत असलेल्या भव्य भागात महाभोज हे नाव बर्याच वेळा आढळते. सांगायचा मुद्दा एवढाच की प्राचीन महाराष्ट्र हा कधीच संयुक्त नव्हता तो तीन भागात विभाजित होता, कर्नाटकात एक जिल्हा आहे ज्याचे नाव आहे 'chamarajanagar' आणि उत्तर भारतात चमार हा समाज आहे आता ते सुद्धा काही वेळाने म्हणतील की त्या जिल्ह्याचा नाव त्यांच्या समजाच्या नावावर पडले असावे असे घडले तर त्यात काही नवल नाही कारण आजकाल काही स्वयघोशित इतिहासकारांनी नव्याने विकृत इतिहासाचा दांडपट्टा चालवला आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
महाराष्ट्राचे नाव महाराष्ट्र हे ‘रठ्ठ’ या लोकांमुळे पडले आहे. ‘रठ्ठ’ हे फार पराक्रमी लोक होते आणि प्रत्येक माणूस हा पराक्रम गाजवल्यानंतर स्वत:ला श्रेष्ठच म्हणवतो. याबद्दलचे सर्व संदर्भ खालील विडीओत दिले आहेत. ज्यांना सत्य जाणण्याची इच्छा आहे आणि जे ऐतिहासिक पुराव्यांमध्ये विश्वास ठेवतात त्यांनी हा विडीओ आवर्जून पहावा. आणि जातीय हेव्यादाव्यांना उगाच आमंत्रण देवु नये. डाॅ. श्रीनंद बापट प्राचीन महाराष्ट्र.
Comments
Post a Comment