गावांच्या नावासमोर लावण्यात येणाऱ्या बुद्रुक आणि खुर्द ह्या शब्दांचा अर्थ काय?

🔹बुद्रूक व खुर्द-- काही गावांच्या पुढे खुर्द लिहलं जात तर काही गावांच्या पुढे बुद्रुक. उदा ऐतवडे खुर्द आणि ऐतवडे बुद्रुक. साधारण अशी गावे जुळी असतात. म्हणजे त्या दोन गावांमध्ये जास्त अंतर नसतं. पण वेगवेगळी ओळख निर्माण होण्याइतकं जास्त देखील असतं. यापैकी ज्या गावापुढे बुद्रुक ते गाव मोठ्ठं. बुद्रुक हा बुजुर्ग या फारसी शब्दाचा अपभ्रंश आहे. बुजुर्ग म्हणजे मोठ्ठा किंवा थोरला. तर खुर्द देखील फारसी शब्द आहे. खुर्दचा अर्थ किरकोळ. मुख्य ठिकाणा शेजारी असणारी किरकोळ वस्ती म्हणजे खुर्द.

🔹कसबा व मौजे -पैकी मौजे हा शब्द अरबी आहे. मौजअ अथवा मौझा या अरबी शब्दांवरुन हा शब्द भारतात आला. या शब्दाचा अर्थ गाव असाच होतो. तर दूसरा शब्द कसबा. कसबा हा शब्द उत्तर अमेरिकेतल्या Quasah या शब्दावरुन आला आहे. हे दोन्ही शब्द मुघल आक्रमणासोबत भारतात आले. कसबा या शब्दाचा अर्थ बाजारपेठेचं ठिकाण असा होतो. याचा दूसरा अर्थ मुळ गाव किंवा जूनं गाव असा देखील आहे.

http://prahaar.in/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%95/amp/


तर मित्रांनो शिवकाळापुर्वी आपल्या महाराष्ट्रात इस्लामी भाषेचा व सत्तेचा खुप मोठा अमल होता,त्यामुळे सगळीकडे उर्दू मिश्रित किंवा फारशी मिश्रित भाषा बोलली जायची. आदिलशाही,कुतुबशाही व मोघल यांच्या अमलात असलेल्या प्रदेशात बुद्रुक व खुर्द हे शब्द वापरले जायचे.

एखाद्या रस्त्यामुळे, किंवा नदी अथवा ओढ्यामुळे एखाद्या गावाचे जर दोन भाग पडत असतील तर ते भाग सम-समान कधीच नसायचे,एक भाग छोटा असायचा व एक गाव मोठा असायचा

.

त्यातील मोठ्या भागाला बुजुर्ग व छोटया भागाला खुर्द म्हटले गेले,बुजुर्ग म्हणजे मोठा आणि खुर्द म्हणजे छोटा. पुढे बुजुर्ग ह्या शब्दाचा अपभ्रंश होऊन बुद्रुक हा शब्द प्रचलित झाला व आज आपल्याला अनेक गावांच्या सुरवातीला बुद्रुक व खुर्द हे शब्द लागल्याचे दिसुन येते.

बुद्रुक ह्या शब्दाचा अर्थ होतो जुना /मोठा…. बुद्रुक म्हणजे गावची मोठी वस्ती किंवा मुळ गाव.

खुर्द म्हणजे गावालगतची नव्याने तयार झालेली लहान वस्ती. किंवा मुळ गावचाच एक छोटा भाग.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

मराठी भाषेवर अनेक भाषांचा प्रभाव असल्याने यात अनेक शब्द हे विविध भाषांमधून घेण्यात आले आहेत. काही शब्द हे आधी जशेच्या तशे घेण्यात आले व हळू हळू त्याचा अपभ्रंश होऊन काही नवीन शब्द तयार झाले. महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा आहेत त्यामुळे काही शब्दांचा अर्थ हा त्या त्या प्रदेशानुसार बदलत जातो.

मानव पाण्याच्या शोधात निघाला आणि जिथे पाणी मिळेल जस मोठे तलाव असो किंवा नदी असो त्याच्या आजूबाजूला वस्ती वसवल्या मग हळूहळू या वस्त्या मोठ्या झाल्या आणि त्यांचे गाव झाले हे गाव नंतर अजून वाढत गेले व मग त्या गावांच्या ओळखीचा प्रश्न निर्माण झाला.

खुर्द हा फारशी शब्द आहे ज्याचा अर्थ लहान किंवा छोटा असा होतो. बुद्रुक हा बुजुर्ग या फारशी शब्दाचा अपभ्रंश आहे ज्याचा अर्थ मोठा असा होतो.

सहसा बुद्रुक आणि खुर्द च्या मध्ये आपल्याला नदी, नाला, ओढा, मोठा रस्ता इ. बघायला मिळत ज्यामुळे ते २ गाव वेगवेगळे होतात.

मुख्य गाव अथवा खेडे, त्याचे पाडे आणि वाड्या अशी गावरचना आपण पाहत असतो. मुख्य शहर आणि त्याची उपनगरे ही रचना आपल्याला माहीत आहेच. मूळ गाव आणि नंतर त्याचा विस्तार यामुळे त्या दोघांची ओळख ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला. मोगली राजवटीत (आधीच्या परंपरेचाआधार धरून) जुनी/मूळ वस्ती, त्यानंतर वसलेली नवीन वस्ती अशी विभागणी करताना नव्याजुन्याची ओळख पटवण्यासाठी हे बु॥ आणि खु॥ अंमलात आणले गेले.

बुजुर्ग = मोठा, थोरला, वडील, खणखणीत, बंदा असे अर्थ निघतात. सद्यस्थितीत फक्त जेष्ठ नागरीक या अर्थाने हा बुजुर्ग (व्यक्ती) शब्द घेतला जातो.

खुर्द = लहान, धाकला, नंतरचा, कमी वयाचा व मानाचा, किरकोळ, फुटकळ, चिल्लर, खुर्दा असे बरेच अर्थ निघतात.

खुर्द व बुद्रुक हे दोन्ही मूळचे फारसी भाषेचे शब्द आहेत.

आधी वसलेले गाव हे खुर्द (खुद्द, स्वतः) असते.

त्याचे शेजारी अगदी लगटून किंवा थोडेसे दूर परंतु आसपासच असे नदी, नाला, टेकडी वा झाडीच्या पलिकडे वसलेले गाव हे बुद्रुक (नंतरचे, कमी महत्त्वाचे) असते.

परकीयांच्या अनेक परंपरांपैकी अंगवळणी पडलेली व प्रचलीत असलेली ही एक परंपरा!


शिवपुर्व कालीन महाराष्ट्रावर बहुतांश मुघल राजसत्ता होती त्यामुळे राज्यव्यव्हाराची भाषा ही फारसी होती. वरील खु. (खुर्द) बु.(बुद्रुक) हे दोन्ही शब्द फारसी आहेत जे मराठी भाषेत आत्ता पुर्ण मिसळून गेले आहेत. बुद्रुक चा अर्थ मोठा व खुर्द चा अर्थ बाजूचा कींवा लहान. म्हणजेच याचा अर्थ आंबेगाव (बु) मोठ कींवा आंबेगाव (खु) लहान /बाजुचा असा होउ शकतो. खाली फारसी शब्द व त्याचे मराठी भाषांतरीत अर्थ

Comments

Popular posts from this blog

पुसदचा इतिहास काय आहे?

'कोकण' हे नाव कसे पडले?

महाराष्ट्रातील कोणत्या गावांची नावे विनोदी आहेत?