भारत देशाला हिंदुस्थान हे नाव कोणी दिले?

इ.स.पू. ३०० सालच्या सुमारास इराणचा सम्राट दरायस याने सिंधू नदी (इंडस्) च्या काठी वसलेल्या समाजव्यवस्थेला सिंधु संस्कृती या नावाने पुकारण्यास सुरुवात केली. याच सिंधु शब्दाचा अपभ्रंश होऊन हिंदू हा शब्द उदयास आला व सिंधू नदीपलीकडील भूमी म्हणून त्या प्रदेशाला हिंदुस्तान असे संबोधले जाऊ लागले. मोगलांच्या शासनकाळामधे हा शब्द जास्त प्रचलित झाल. मोगलांच्या दिल्ली हे केंद्र (राजधानी?) असलेल्या अधिराज्याचा, म्हणजे उत्तरी भारताच्या विशाल प्रदेशाचा नामोल्लेख हिंदुस्तान असा केला जाई. हिंदुस्तान या शब्दावरून त्या प्रदेशातील वैदिक धर्माला हिंदू धर्म हे नाव पडले.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••√••••••••••••••••••••

सिंधु नदी पात्राच्या आसपास रहात असल्याने सिंधु संस्कृती उदयास आली होती. पर्शियन भाषेत "स" चा उच्चार "ह" असा होतो.

पर्शियन लोकांनी या भागाला हिंदोस्तांन असे संबोधण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे सिंधुवासी असलेले हिंदोस्तानी व पुढे जाऊन त्याचे हिंदुस्थान असे नामकरण झाले.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


Comments

Popular posts from this blog

पुसदचा इतिहास काय आहे?

'कोकण' हे नाव कसे पडले?

महाराष्ट्रातील कोणत्या गावांची नावे विनोदी आहेत?