विदर्भाला 'विदर्भ' हे नाव कसे पडले?

आज ज्या भागाला वीदर्भ म्हटले जाते तो पयर्न पणे वीदर्भ नाही। गोंदिया जिल्हा आणि भंडारा,चंद्रपूर, गडचिरोली हे चार जिल्हे विदर्भ नाहीत।

असो ही प्रस्तावना यासाठी केली की दर्भ नावाचे एक गवत असते त्याला गोंदिया भगत पड्यार असे म्हणतात। याला गणपतीच्या दिवसात पांढरी कापसाच्या सारखी असणारी फुले येतात। हे गवत म्हणजे सरळ लांब अगदी 3 ते 4 फूट इतके उंच होते। थोडे कडक असते व अगदी सरळ उभे राहते बासा / बांबू सारखे ।

या गवताचा उपयोग पूजेत केला जातो। अगदी गीतेत देखील याचा संदर्भ मिळतो। याला चटई सारखे विणुन आसन पण तयार करता येते। याला पिळून दोरी पण करता येते। दोरी बरी टिकते पण शेतातील कामात उपयोग होतो।

  • तर वी - दर्भ याचा अर्थ ज्या देशात दर्भ होत नाही तो भाग /प्रदेश। हे खरे आहे की वर्धा , नागपूर अमरावती इत्यादी भागात दर्भ जातीचे गवत दिसत नाही पण इथे देखील ते पूजेत वापरतात। अजूनही नागपूरचे गुरुजी ,पुजारी हे गवत या गोंदिया, भंडारा भागातून नेतात पूजेसाठी।

असो मूळ विदर्भात दर्भ होत नाही यासाठी त्याला विदर्भ म्हटले जाते असे मला एक गुरुजींनी सांगितले आणि याच पडताळा करून मी खात्री केली आहे। हे गवत विदर्भ भागात का होत नाही याचा वनस्पती शास्त्री लोकांनी शोध घ्यावा असे वाटते।

हे गवत शेतात झाले तर ते पिकाला नुकसान पण करते। आणि ते अमर पण आहे। एक कथा अशी आहे की समुद्र मंथनातून निघालेले अमृताचा कुंभ दर्भावर ठेवला होता मोहिनींनी। साप योनीतील कोणी तरी ते पहिले व त्यावर जे थेंब पडले ते मोहिनीनि उचलून नेल्यावर ते चाटले (यामुळे साप योनीतील वय फार असते अगदी शेकडो वर्षे) पण त्या गवताला जी धार असते तिच्या मुले सापाची जीभ कापली गेली आणि त्यामुळेच सापाची जीभ द्विभाजीत असते। (ही एक पुराणातील आख्यायिका आहे)

माझ्या मते कुश आणि दर्भ हे एकच आहे। खरे काय ते अधिकारीच सांगतील। पण गीतेतील सहाव्या अध्यायाचा एक श्लोक देत आहे ज्यात कुश गवताचा संदर्भ येतो


विदर्भ ह्या नावाचा उल्लेख अनेक शास्त्रात पुराणांंत आला आहे.

ऋग्वेद हा मानवाला ज्ञात असलेला सर्वात प्राचीन ग्रंथ. ह्या ग्रंथातील शेकडो ऋचाकर्त्यौंपैकी एक म्हणजे लोपमुद्रा, हि विदर्भ देशाची राजकन्या होती.

ती अगस्त्य ऋषींंची पत्नी देखील होती.

इतक्या प्राचीन अर्वाचीन प्रदेशाचे विदर्भ हे नाव कसे पडले असावे? देवच जाणो.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

वरील फोटो आहे दर्भ या गवताचा आहे.

या प्रदेशात भरपूर प्रमाणात दर्भ (गवत) उपलब्ध असल्याने या भागाचे नाव विदर्भ पडले.

विपुल प्रमाणात दर्भ = विदर्भ

महाभारतकालीन राजा “विदर्भ” याच्या नावावरून या भागाला विदर्भ नाव देण्यात आले असाही एक समज आहे.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••



Comments

Popular posts from this blog

पुसदचा इतिहास काय आहे?

'कोकण' हे नाव कसे पडले?

महाराष्ट्रातील कोणत्या गावांची नावे विनोदी आहेत?